Top News

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन ग्रामपंचायत धिडशी तर्फे वृक्षारोपण.



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- आज दिनांक ०५-०६-२०२१
ग्रामपंचायत धिडशी तर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे महत्व व त्यांचे संवर्धन ही काळाची गरज असून कोरोना संक्रमण स्थितीमध्ये संपूर्ण भारतभर ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे वृक्षांची आठवण सर्वांना प्रकर्षाने जाणवली. सर्वांनी वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करावे, नैसर्गिक साधन संपत्ती जसे पाणी, विज इत्यादींचा काळजीपूर्वक वापर करणे गरजेचे आहे.

कर्यक्रमाला उपस्थित सुनील उरकुडे पशुसंवर्धन सभापती, सतिश धोटे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, सचिन शेंन्डे भाजयुमो तालुका अध्यक्ष, डॉ विपिन कुमार ओडेला, सरपंच रिता हनुमंते, उपसरपंच राहुल सपाट, संतोष काकडे, विनोद कोरडे, मंगला ढोके, माया जिवतोडे, सिंधुताई निखाडे, बालाजी कोरडे, मधुकर काळे, दत्तु ढोके, राजु वराटे, राहुल उरकुळे, निलेश ऊरकुळे, अनिकेत ऊरकुळे, श्रीकांत ऊरकुळे, डॉ. काकडे, मधुकर पाहानपटे, सुभाष परसुटकर, विपीन यंगलवार, गणेश रामकुंडावर, आशिष आलंचवार, वासुदेव निखाडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने