Top News

चंदनखेडा ग्रामपंचायत कडून गावात मच्छर दाणी वाटप.



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील मौजा चंदनखेडा ग्रामपंचायत कडून ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या चंदनखेडा, मक्ता, चरूर (धारपुरे), बोरगाव (धांडे) या गावात मच्छर दाणी वाटप करण्यात आल्या.
दिवसेन दिवस रोगांचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता चंदनखेडा ग्राम पंचायत कडून नवीन नवीन उपक्रम राबविले जात यातूनच एक पावसाळ्याचे दिवसा मध्ये मच्छरांचे प्रमाण वाढत असून या दिवसा मध्ये मलेरिया या सारखे रोगांचे प्रमाण वाढत असते याचीच दखल घेत चंदनखेडा ग्रामपंचायत कडून 14 वा वित्त आयोग निधीतून गावातील प्रत्येक ग्रामपंचायत च्या खातेदाराच्या प्रत्येक घरी जाऊन मच्छरदाणी वाटप करण्यात आली. 
या वेळी ग्रामपंचायत चे सरपंच नयन बाबाराव जांभूळे, उपसरपंच भारातीताई शरद उरकांडे, ग्रामपंचायत सदस्य निकेश भागवत, बंडू निखाते, नानाजी बगडे, मुक्ता सोनूले, प्रतिभा दोहतरे, रंजना हनवते, श्वेता भोयर, सविता गायकवाड , आशा नंनावरे उपस्तीत होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने