Top News

पाच दिवसांत दिव्यांगाचे अनुदान जमा करा, अन्यथा पंचायत समिती ताब्यात घेऊ.

प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे यांचा इशारा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- संपूर्ण जगावर कोरोना संकट उद्दवल आहे संपूर्ण देश एकजुटीने सामना करत आहेत.पण जिवती तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतीनी दिव्यांगांसाठीचा ५ टक्के निधी अखर्चित ठेवला आहे या विरोधात प्रहार जनशक्ती प्रकक्षाने एल्गार पुकारला असुन येत्या पाच दिवसांत तालुक्यातील १०० टक्के लाभार्थ्यांना अनुदान पाठव करा अन्यथा पंचायत समिती ताब्यात, घेऊन अधिका-यांना त्यांच्या दालनात कोडू अशा इशारा प्रहार जनशक्ती पक्षचे रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी दिला आहे. 

 ज्या ग्रामपंचायत ने निधी वाटप केला नाही अशा ग्रामपंचायत ला तातडीने सुचना देऊन ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व सरपंचांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी प्रहार संघटनेच्या रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी ऑनलाईन तक्रार अर्ज जिवती पंचायत समिती, मुख्याधिकारी चंद्रपुर, चंद्रपूर जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, ना.बच्चुभाऊ कडू राज्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे करण्यात आलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की चालू वर्षातील अपंग कायद्या अंतर्गत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचा ५ टक्के निधी मार्च २०२१ अखेर खर्च न करणा-या सर्व ग्रामसेवक व संरपंच यांच्या निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी तसेच अशा निधी खर्च न करणा-या ग्रामसेवक व सरपंचावर गुन्हा नोंद करण्यात याव्या व संवर्ग विकास अधिकारी यांना सुचना देवूनही एक महिन्याच्या वर कालावधी लोटूनही कुठलीच दखल न घेतल्यामुळे, आता निवेदन नाही तर सळर हल्ला बोल असे म्हणत येणाऱ्या पाच दिवसांत दिव्यांगाच्या खात्यात पैसे जमा करा अन्यथा पंचायत समिती ताब्यात घेऊ अशा इशारा प्रहार चे रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने