पोंभुर्णा तालुक्यातील मोटर सायकल व मोटरपंप चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त.

Bhairav Diwase
तीन जण अटकेत तर एक जण फरार.

चोरी केलेल्या 3 मोटरसायकल व 3 मोटरपंप आरोपींकडून जप्त.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोंभुर्णा येथून जवळच असलेल्या देवई गावातील आरोपी पंकज कोडापे, व गणेश पान्हावार यांनी मोटर सायकल व मोटर पंपाची मिळुन चोरी करायचे. दोन्ही आरोपींनी दि. 01 जुनला 1 मोटर सायकल चोरी केली. चोरी केलेल्या मोटरसायकलचा वापर करून दि. 02 जुनला 03 मोटार पंपाची चोरी केली. दि. 03 तारखेला पोंभुर्णा पोलीसांनी आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला.

दि. 04 जुनला पोलिसांनी देवई गावात सापळा रचून आरोपी पंकज कोडापे याला अटक केली. आरोपी पंकज कोडापे यांच्या PCR तपासात दिनेश नैताम, गणेश पान्हावार, अब्दुल रझाक अब्दुल गफार हे आरोपी निष्पन्न झाले.
आरोपी पंकज कोडापे, आरोपी दिनेश नैताम व आरोपी अब्दुल रझाक अब्दुल गफार, आरोपी गणेश पान्हावार यांच्यावर पोंभुर्णा पोलिसांनी 379, 34, 411 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोंभुर्णा पोलिसांनी सापळा रचून मोटरसायकल व मोटरपंप चोरांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात व आरोपींना अटक करण्यात पोंभुर्णा पोलिसांना यश आले आहे.
याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आले असून आरोपी गणेश पान्हावार फरार झाला आहे. 3 आरोपींना न्यायालयात कोठडी सुनावली आहे. आरोपी गणेश पान्हावार फरार झाला असून त्याचा शोध पोलिस घेत आहे. चोरी केलेल्या एकूण 3 मोटरसायकल व 3 मोटरपंप आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत.
हि कारवाई उपविभागीय अधिकारी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात पोंभुर्णा पोलिस स्टेशनचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी, उपनिरीक्षक दादाजी ओललवार, फौजदार संतोष येंनगंटीवार, हवालदार सुधीर बोरकुटे, राजकुमार चौधरी, नवनीत सोनुले, अविनाश झाडे यांनी केली.