भाजपा नागभीड तालुक्याचे वतीने नागभीड येथे ओबीसी आरक्षणास जबाबदार राज्य सरकारच्या निषेधार्थ चक्काजाम आंदोलन.

Bhairav Diwase
मा.बंटीभाऊ भांगडीया यांचे मार्गदर्शनात व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांच्या नेतृत्वात नागभीड येथे चक्काजाम.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभीड:- महाराष्ट्र राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे व सुप्रीम कोर्टात बरोबर पाठपुरावा न केल्याने ओबीसींचे आरक्षण हे रद्द करण्यात आलेले आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र यांचे मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी नागभीड तालुकाच्या वतीने आज दि.२६ जून रोजी टी-पॉइंट नागभीड येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.ह्या आंदोलनात जबाबदार असलेल्या तिघाडी राज्य सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे. ओबीसींना परत आरक्षण मिळणेसाठी न्यायालयात पण जाऊ तसेच आरक्षण पूर्ववत होत नाही तो पर्यंत निवडनुका होऊ देणार नाही अशी भूमिका या आंदोलनात घेण्यात आली.यावेळी ओबीसी समाजास पुन्हा राजकीय आरक्षण मिळणे संदर्भात करण्यात येणाऱ्या चक्काजाम आंदोलना विषयी श्री. संजयजी गजपुरे भाजपा जिल्हा महामंत्री चंद्रपूर,श्री.संतोष भाऊ रडके भाजपा तालुकाध्यक्ष नागभीड तसेच तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांचे कडून जनतेला मार्गदर्शन करण्यात आले.तसेच ओबीसी समाजासाठी सर्व समाजातील व्यक्तींनी एकत्र येऊन चक्काजाम आंदोलनात झाल्याने ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी चक्काजाम ओबीसी मध्ये आक्रोश दिसून आला.


महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण समाप्त झाले आहे.त्यामुळे ओबीसी समाजाच्या घटनादत्त अधिकारांवर गदा आलेली आहे.ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हजारो स्थानिक स्वराज्य संस्थामधील प्रतिनिधींवर अन्याय झालेला आहे.यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत ओबीसीना खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवावी लागणार आहे,त्यामुळे ओबीसी समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियेतेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झालेला आहे.हा चक्काजाम आंदोलन फक्त एक सुरुवात असून जर ओबीसी ला आरक्षण मिळाले नाही तर अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे या आंदोलनात भाजपा तालुका पदाधिकारी नागभीड यांचे कडून सांगण्यात आले.
ह्या चक्काजाम आंदोलन प्रसंगी- संजयजी गजपुरे भाजपा जिल्हा महामंत्री चंद्रपूर,संतोष भाऊ रडके भाजपा तालुकाध्यक्ष नागभीड,आवेशजी पठाण सभापती कृ.उ.बा.स नागभीड,जगदीश सडमाके तालुका महामंत्री नागभीड, रमेश पा.बोरकर उपसभापती कृ.उ.बा.स नागभीड, हिरे सर नगराध्यक्ष न.प.नागभीड, गणेशजी तर्वेकर उपाध्यक्ष न.प.नागभीड, सचिनजी आकुलवार बांधकाम सभापती न.प.नागभीड, सुष्माताई खामदेवे पं.स.सदस्य, दयारामजी कन्नाके, ईश्र्वरजी मेश्राम, रमेशजी बोरकर जि.प.प्रमुख, धनराजजी बावनकार जि.प.प्रमुख, अरविंद भुते जि.प.प्रमुख, सुनिल शिवणकर, परमानंद गहाने, दिलीपजी कामडी, ईश्वरकुमार कामडी, छगन कोलते,दिपक ठाकरे,अशोकजी ताटकर,परिष शेंडे,नेताजी शेंडे, तानाजी थेरकर, केदार मेश्राम,अरविंद नागपुरे, नितेश कुरझेकर,धनराजजी ढोक,शिरिषजी वानखेडे, सचिन चिलबुले,उज्वला माटे,दुर्गाताई चिलबुले,संगीताताई गहाने, गीताताई धारने ,विनोद हजारे,गोपाल खामदेवे,राजू पिसे,बालुभाऊं मेश्राम,संजय मालोदे,अमोल देशमुख तसेच समस्त ओबीसी बांधव व तालुक्यातील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.