आंदोलनात सर्व ओबीसी समाज बांधवांनी सहभाग घ्यावा, माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे आवाहन.
राजुरा:- केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावनी ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून केली जाते. यात संस्थेतील लोकप्रतिनिधी हा महत्त्वाचा घटक असतो पण याच स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने समाजावर मोठा अन्याय झाला आहे.त्यामुळे या समाजाचे आरक्षण अबाधित राहिलेच पाहिजे या मागणीसाठी ओबीसी आक्रमक झाला असून त्यांनी बामणी फाट्या वरील राष्ट्रीय महामार्गावर दि.26.06.2021 रोज शनिवार ला सकाळी 10.30 वा. चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्व ओबीसी समाज बांधवांनी सहभाग घेऊन ओबीसीचा आवाज बुलंद करावा असे आव्हान माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केले आहे.
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे.कोर्टाने हा निर्णय दिल्यानंतर सरकारने याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले व मागासवर्ग आयोग नेमला नाही.त्यामुळे 50 % च्या टक्क्यांच्या आतले आरक्षण हे सत्तेतील महाविकास आघाडी सरकारच्या बेजबाबदारपणामुळे रद्दबातल झाले आहे. हे महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे असा आरोप माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केला आहे. मुळात यासाठी तातडीने एमपीरिकल डेटा तयार करण्याची गरज असतांना केवळ राजकारण करण्यात मंत्री मग्न होते. सरकारच्या याच चुकीच्या धोरणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकले नाही.या अन्याया विरोधात ओबीसी समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यात 1000 ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून त्याचाच एक भाग म्हणून बामणी फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात राजुरा मतदारसंघातील ओबीसी समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केले आहे.