(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चिमूर:- चिमूर येथील गाँधी वार्ड मधील कुलदीप चंदूजी दड़मल (२२) या युवकाने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळी ७ वाजताचा सुमारास उघडकिस आली. आई वडील व घरची मंडळी खाली घरीच असतांना त्याने वर आपल्या रूम मध्ये गळफास घेतला.
संदीप हा होंडा शो रूम मध्ये काम करीत होता.कामावर येत नसल्याने मालक घरी गेले असता वडिलांनी कुलदीपला फोन केला मोबाईलवर प्रतिसाद मिळत नसल्याने वर रुम असल्याने आवाज दिला त्यालाही त्याने प्रतिसाद दिला नाही खिडकीतुन डोकाऊन पाहिले असता कुलदीप याने गळफास घेतला होता.
आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट असून पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे यांचे मार्गदर्शनात चिमुर पोलिस करीत आहे.
#chimur #chimursuiside #suiside #chandrapur #Adharnewsnetwork