मोटारसायकल व बोलेरो पिकअपची जोरदार धडक. #accident

Bhairav Diwase

भीषण अपघातात 2 ठार जागीच ठार.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुल:- मुल शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोणी फाट्याजवळ दुचाकीने जात असलेल्या दोघांचा अपघात झाल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.
दुचाकीस्वार हे मुल वरून चंद्रपूर कडे तर चारचाकी वाहन बोलेरो पिकप की चंद्रपूर वरून मुलकडे येत असल्याचे कळते. मृतकाचे नाव सुरेश कन्नाके वय अंदाजे 38, विकास गावळे वय अंदाजे 40 असे आहे.
दुचाकीस्वार हे गोंडपिपरी तालुक्यातील लिखीतवाडा या गावातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असुन पुढील तपास सुरु आहे.