Top News

वीज पडून लक्कडकोट येथील एक शेतकरी ठार. #Lightningstrikes


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- आज अचानकपणे आलेल्या पावसात वीज पडून वारलु जंगळुजी रामटेके वय ४५ राहणार लक्कलकोट या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी २ वाजताच्या दरम्यान खिर्डी शिवारात घडली. खिर्डी शिवार लक्कडकोट पासून २ किमी अंतरावर आहे.
वारलु रामटेके आपल्या शेतात काम करीत होते. #Lightningstrikes
दरम्यान दुपारी अचानकपणे विजाच्या कडकडाटासह पाऊस कोसडू लागला त्यामुळे जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी जात असतानाच वारलू रामटेके यांचेवर वीज पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती शेजारील शेतकऱ्यांना होताच त्यांनी मोक्यावर धाव घेत पोलीस व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना घटनेसंदर्भात माहिती दिली. मृतकाच्या मागे आई, बाबा, पत्नी व दोन भाऊ आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने