विनायक गरमडे यांची मानवाधिकार सहायता संघटनेच्या जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती. #Appointment

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- येथील युवा सामाजिक कार्यकर्ते विनायक गरमडे यांची मानवाधिकार सहायता संघटनेच्या चंद्रपूर जिल्हा प्रमुख पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी राजेश सैनी यांनी केली. मानवाधिकाराचे हनन आणि समाजातील वाईट गोष्टींच्या विरोधात लढण्याकरीता ही संघटना कार्य करते. गरमडे यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. #Appointment