घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला दुर्गापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.#Criminals(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- उर्जानगर येथील समतानगर वार्ड क्रमांक 6 येथे राहणारे 39 वर्षीय रमेश सुखदेव टेकाम यांनी 19 जुलैला दुर्गापूर पोलीस स्टेशनला घरफोडी झाली असल्याची तक्रार दिली.
25 जून ला टेकाम हे कुटुंबियांसमवेत बाहेर गावी गेले होते, आज ते ड्युटीवर हजर झाले असता त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना माहिती दिली की तुमच्या घरातील कुलूप तुटलेल्या अवस्थेत आहे.
    टेकाम हे तात्काळ घरी पोहचले असता त्यांना घरातील वस्तू अस्तव्यस्त अवस्थेत आढळले. बेडरूम मधील लोखंडी कपाटातील लॉकर मध्ये अंदाजे 15 ग्रॅम सोन्याचा गोफ किंमत 45 हजार, 5 ग्राम सोन्याची अंगठी किंमत 15 हजार असा एकूण 60 रुपयांच्या वस्तूवर अज्ञात चोराने डल्ला मारला. टेकाम यांनी दुर्गापूर पोलीस स्टेशनला यासंबंधी तक्रार दिली.
    गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेता दुर्गापूर गुन्हे अन्वेषण विभागाने सखोल चौकशी सुरू केली, गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभागाने दुर्गापूर मार्केट परिसरात संशयित अमोल आदेश इलमकर वय 20 वर्ष हा फिरत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विचारपूस केली.
अमोल ची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून सोन्याचा गोफ व अंगुठी, 425 ग्राम चांदीचे दागिने व नगदी 4 हजार 500 रुपये मिळून आले.
 जप्त करण्यात आलेल्या मालाची पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने ती घरफोडी केली असल्याची कबुली देत रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 1 व दुर्गापुरात 2 गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक करीत एकूण 94 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल आरोपिकडून जप्त केला.
   सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रपुर अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर अतुल कुलकर्णी, उपविभागिय पोलीस अधिकारी चंद्रपुर शिलवंत नांदेडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन दुर्गापुर स्वप्निल धुळे यांचे नेतृत्वात दुर्गापुर गुन्हे शोध पथकातील पो.उप.नि. प्रविण सोनोने, पो.हवा सुनिल गौरकार, पो.अं. मनोहर जाधव, पो.अं. सुरज लाटकर, पो.अं. संतोष आडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
#Criminals

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत