वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची जि. प. कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांनी केली घटनास्थळी पाहणी. #Deathanimals

मृत जनावरांच्या मालकांना शासकीय मदत मिळवून देण्याचं दिले आश्वासन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- सविस्तर वृत्त असे आहे की काल झालेल्या वादळी पावसामध्ये अमलनाला तलावलगत गुराखी जनावरांना चारत होते दरम्यान जनावरांवर वीज पडून अनेक जनावरांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.


या घटनेची भाजपा नेते तथा नोकारी गावचे उपसरपंच यांनी या घटनेची माहिती जी. प. चे कृषी व पशसंवर्धन सभापती श्री सुनील उरकुडे यांना दिली. त्याअर्थी आज दिनांक 08.04.2021 ला सभापती यांनी घटनास्थळ गाठले.
सभापती यांनी घटनास्थळी मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची पाहणी केली. तेव्हाच राजुरा चे तहसीलदार श्री हरीश गाडे यांना भ्रमणधवनी द्वारे संपर्क करून जनावरांचा विल्हेवाट लावा कारण तलावातील पाणी पिण्याकरिता वापर केला जातो तसेच नजदीक असलेल्या शेतकऱ्यांना दुर्गंधी मुळे त्रास होईल कामा नये असे बोलणे झाले..
तसेच सभापती यांनी घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ झल्लेवार यांना त्यांच्या टीम सोबत बोलावून मृत जनावरांचा पोस्ट मॉडर्न स्वतः उपस्थित राहून करायला लावला. त्यानंतर मृत जनावरांच्या मालकांन सोबत चर्चा केली..
सोबत असलेले भाजपा नेते तथा नोकरी गावचे उपसरपंच श्री वामन तुराणकर यांनी सभापती यांना मृत जनावरांच्या मालकांना झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळवून देण्याची मागणी केली. तेव्हा उपस्थित शेतकरी बांधवांना शासनाच्या वतीने जेवढी जास्त मदत मिळेल तेवढी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
जी. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती यांनी शेतकऱ्यांवर कोसळलेल्या दुःखात सहभागी झाले व झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने तेथील शेतकरी बांधवांनी त्यांचे आभार मानले.


  यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी राजुरा डॉ जल्लेवर, डॉ कळमकर व त्यांची टीम,माजी जिल्हा परिषद सदस्य नानाजी आडे ,तलाठी वडस्कर साहेब, युवानेते दिपक झाडे, अजय बांदुरकर,उपसरपंच देवरावजी आडे,बैलमपुर चे उपसरपंच अरविंद दुर्गे, व मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.   #Deathanimals

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत