Top News

उपसभापती महेश देवकते यांची ग्रामपंचायत खडकी (हिरापूर) ला भेट. #jivati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:-:तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ग्राम पंचायत, खडकी (हिरापूर) ला जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेशजी देवकते यांनी भेट दिली. #jivati
त्यावेळी खडकी (हिरापूर) या अतीदुर्गम गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच गावातील 18 वर्षे वयोगटावरील नागरिकांना कोविड-19 लसीकरण संदर्भात व लस घेण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन केले. ग्राम पंचायत खडकी (हिरापूर) अंतर्गत मौजा: कोलांडी, डोंगरगाव, गोंदापुर, गट्टेदासगुडा, हिरापूर, खडकी, टाटाकोहाड, पोचूगुडा, चोपनगुडा अशी गावे असून, सदर गावातील मुख्य समस्या म्हणजे 9 गावे मिळून एक गट ग्राम पंचायत आहे. त्यामुळे अनेक गावांना सोई-सुविधा व लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी व सदर गावे ग्रा.पं.कार्यालयापासून दुर असल्यामूळे नागरिकांना कार्यालयीन कामासाठी प्रचंड अडचण होतं असते, त्यामूळे सदर गावातील नागरिकांनी ग्राम पंचायत विभाजन करण्यासाठी पाठपुरावा करावी अशी उपसभापती महेश देवकते यांचेकडे विनंती केली असता, उपसभापती महेशजी देवकते यांनी ग्राम पंचायत अंतर्गत विभाजनाचा प्रस्ताव तयार करून, पंचायत समिती ला पाठविण्याच्या सूचना ग्रामपंचायतीचे सरपंच/सचिव यांना केली तसेच प्रस्ताव प्राप्त होताचं ग्रा.पं.विभाजनाचे प्रस्ताव योग्य मार्गाने पाठविण्याकरीता पं.स.ला निर्देशित करण्यात येईल अशी नागरिकांना ग्वाही दिली तसेच ग्रामपंचायत पदाधिका-यांसोबत चर्चा करून, गावाचा विकास कसा साध्य करता येईल यावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ग्रामपंचायत, खडकी (हिरापूर) चे पदाधिकारी सरपंच- अमृतवर्षा पिल्लेवाड, उपसरपंच- सौ. अनिता मरके, श्री. नारायण जाधव सदस्य, श्री. अर्जुन मडावी, सौ. लिलाबाई मडावी, अनुसया गेडाम, सौ. यमुनाबाई वाघमारे तसेच ग्रामसेवक बोरचाटे, शिवाजी बाईनवाड , चंद्रकांत कोमल , गणेश वाघमारे , उत्तम पोले , गणेश मरके , बालाजी पिल्लेवाड, सचिन राठोड व प्रेमसिंग राठोड आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने