🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

केमारा-देवाडा खुर्द जिल्हा परिषद क्षेत्रात विविध कार्यक्रम राबवून आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. #Pombhurna

राजकारण हा समाजकार्याचा राजमार्ग मानणारे नेतृत्व म्हणजे आ. सुधीर भाऊ:- जि.प.सदस्य राहुल संतोषवार
पोंभुर्णा:- सतत जनकल्याणाचा ध्यास घेऊन, विकासाचा ध्यास उराशी बाळगत लोकसेवा करणारे महाराष्ट्राचे लाडके नेते लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी अर्थ व नियोजन मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज केमारा- देवाडा खुर्द जिल्हा परिषद क्षेत्रात जिल्हा परिषद सदस्य श्री.राहुल संतोषवार यांनी विविध कार्यक्रम राबवून सेवा दिवस साजरा करण्यात आला. #Pombhurna


जेष्ठ नागरिक (शैक्षणिक, राजकीय, सामाजिक) आज सत्कार करण्यात आला. जामतुकुम रै येथील नारायण पा. सातपुते, पोंभुर्णा येथील जेष्ठ नागरिक दिगांबरजी गेडाम, जीवनदासजी खोब्रागडे, माजी जि.प.सदस्य बंडूपंथ पा.बुरांडे, देवाडा खुर्द ग्रामपंचायत चे अविरत १५ वर्ष सरपंच पदावर कार्य करणारे कुकसु पा.घोंगडे, पोंभुर्णा येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री. आनंदराव बावणे यांना नुकताच झाडीबोली साहित्याचा पुरस्कार जिल्ह्यात प्रथम प्राप्त झाल्याबद्दल, आष्टा येथील पुरस्कार प्राप्त उत्कृष्ट शेतकरी प्रदीप पा. दिवसे, आंबेधानोरा येथील कृषिमित्र प्रकाश कज्जपवार यांनी विविध बि-बियाणे वर प्रक्रिया केल्याबद्दल, कोरोना महामारीच्या काळात पोंभुर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश मामीडवार साहेब यांनी कोरोना रुग्णाच्या आरोग्यासाठी अविरत कार्यकेल्याबद्दल, डॉ.कु.रिनल पद्मगिरीवार, देवाडा खुर्द येथील डॉ. गांगरेडीवार यांनी कोरोना काळात तत्परतेने सेवा दिल्याबद्दल त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. पोंभुर्णा येथील डॉ.अनिकेत अशोक गेडाम यांचे वैद्यकीय शिक्षण चे शिक्षण पूर्ण करून पोंभुर्णा सारख्या ग्रामीण भागात अविरत सेवा देत आहेत त्याबद्दल त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. दिलीप मक्कलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त घरी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
 


      जुनगाव येथील भाजपचे जेष्ठ नेते तथा ग्रामपंचायत निवृत्त कर्मचारी पांडुरंग पा. पाल, आंबेधानोरा येथील गणेश बिठुरवार इत्यादी महाविभूती जेष्ठांचा सत्कार आज शाल, श्रीफळ, सिंहावलोकन, पुष्पगुच्छ, पेन देऊन  सत्कार करण्यात आला.

      बोर्डा दीक्षित येथे जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण, उमरी पोतदार येथील कराटे टीम ला खेळाच्या साहित्याचे किट देण्यात आले. गोरगरीब कुटुंबांना पिण्याचे पाणी आणण्याकरिता आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल संतोषवार यांनी जनासुविधा अंतर्गत कॅन मंजूर करून मौजा आंबेधानोरा, उमरी पोतदार येथील   प्रत्येक कुटुंबाला कॅन चे वितरण करण्यात आले. गंगापूर नवीन येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक व बिस्कुट चे वाटप, चेक आष्टा येथील विध्यार्थ्यांना मास्क चे वाटप, जामतुकुम, जामखुर्द येथील वृद्ध व्यक्तींना चालण्याकरिता वाकिंग स्टिक काळी चे वाटप करण्यात आले.
      
   

 पोंभुर्णा येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय मध्ये ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी अभ्यासाकरिता मोठ्या प्रमाणात येत असतात त्यांना जि. प. सदस्य राहुल संतोषवार यांनी मागील वर्षांपासून मुलांना दुपारचा चहा देत आहेत. आज आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढीवसानिमित्त चहा टी मशीन भेट देऊन वाचनालय ची विद्यार्थ्यांनी कु. सायली पंदिलवार च्या हस्ते रिबीन कापून लोकार्पण करण्यात आले. या प्रकारे आज जिल्हा परिषद क्षेत्रात विविध लोकाभिमुख कार्यक्रम घेऊन आ. सुधीर मुनगंटीवार यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 

    यावेळी उपस्थित पंचायत समिती सभापती ज्योती बुरांडे, भाजपा उपाध्यक्ष मनोज मुलकलवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष अजय मस्के, भाजयुमो शहराध्यक्ष विनोद कानमपल्लीवार, सरपंच ठाणेश्वरीताई लेनगुरे,उपसरपंच मंगेश उपरे,सरपंच निरंजनाताई मडावी,उपसरपंच रमेश हलमलवार,सरपंच बंडू बुरांडे शक्तिकेंद्र प्रमुख परशुराम बुरांडे,युवा महामंत्री आदित्य तुमूल्लवार,शक्तिकेंद्र प्रमुख जयंत पिंपळशेंडे,राहुल सातपुते, लक्ष्मण गव्हारे, चंद्रशेखर झगडकर, स्वप्निल पोगुलवार, मंगेश माडे, इत्यादी भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.