Click Here...👇👇👇

पंचायत समिती पोंभुर्णाच्या वतीने आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्याने विविध कार्यक्रम राबवून वाढदिवस साजरा. #Pombhurna

Bhairav Diwase

आ. सुधीरभाऊ म्हणजे आपल्या तालुक्याला मिळालेली अनमोल भेट आहे :- कुमारी अल्काताई आत्राम.
पोंभुर्णा:- पंचायत समिती पोंभुर्णाच्या वतीने या विभागाचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे वाढदिवसाच्या निमित्याने विविध योजना राबून साजरा करण्यात आला. यावेळी प.स .च्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला,तसेच विविध ग्रा.प मध्ये सुद्धा वृक्षारोपण करण्यात आले. प.स च्या संत गाडगे महाराज सभागृहात विविध योजनाच्या लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यामध्ये आंतरजातीय विवाह जोडप्याना ५०,००० रु धनादेश देण्यात आले, तसेच माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थीना चेकचे वितरण करण्यात आले. छोट्या मुलींच्या व्यवस्थित संगोपणासाठी बेबी केयर किटचें वितरण करण्यात आले. दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कार्डचे वितरण करण्यात आले, तसेच आरोग्य विभागाच्या वतीने देवई व केमारा येथे मच्छरदाणी वाटप करण्यात आले. #Pombhurna
या विभागाचे आमदार म्हणून शासकीय कार्यालय पासून तर गावातील ग्रा.प पर्यंत केलेल्या कामाचा उल्लेख नेहमीच होत असतो. मा.भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्याने अशा विविध योजना लाभार्थी पर्यंत पोहचून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले.
   
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, पंचायत समिती सभापती कु.अल्का आत्राम, पंचायत समिती उपसभापती ज्योती बुरांडे, बिडीओ सुनीता मरस्कोल्हे, पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख, गंगाधर मडावी, सिडिपीओ भोयर, कृषी अधिकारी कुरजेकर, विस्तार अधिकारी मसराम सर, लाडे सर, वैशाली बोलमवार, हरीश ढवस, ओमदेव पाल, अजय मस्के, बालू पिंपळशेडे, रंजीत पिंपळशेडे, वैभव पिंपळशेडे, आदित्य तुंम्मुलवार,स्वप्निल पोगुलवार, इतर पदाधिकारी उपस्थित होते.