ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित. #Ruralpressassociation #Executiveformed

Bhairav Diwase
0

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून अनिल स्वामी, उपाध्यक्ष सतीश बोम्मावार, सचिव लखन मेश्राम तर प्रसिद्धीप्रमुख म्हणून आशिष दुधे यांची एकमताने निवड करण्यात आली. #Ruralpressassociation #Executiveformed
सावली तालुक्यात सध्या अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाने कोरोना काळात रक्तदान शिबिरे घेऊन राष्ट्रीय कार्यास हातभार लावलेला आहे. तसेच विलगीकरनात असलेल्या नागरिकांना भोजनदान सुद्धा केले. आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबीर, मास्क वाटप आदी असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून या संघाने तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे सावली तालुक्यात सध्या वर्चस्व असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.
कार्यकारिणी गठित करण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे प्रवीण गेडाम, दिलीप फुलबांधे, विजय कोरेवार, सुधाकर दुधे, शितल पवार, अनिल गुरनुले, राकेश गोलेपल्लीवार, सुजित भासारकर, खोजिंद्र येलमुले, आशिष पुण्यपवार, रविंद्र कुडकावार, देवाजी बावणे, प्रफुल तुम्मे हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)