Click Here...👇👇👇

नविन होंडा शाइन गाडी चोरी; नांदा फाटा येथे भंगार चोर सक्रिय. #Theft

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- तालुक्यातील नांदाफाटा परिसरात मागील दोन महिन्यापासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत बुधवारच्या रात्री (ता. २१) 1:30 वाजताचे सुमारास चोरट्यांनी होंडा कंपनीची काळ्या रंगाची एमएच ३४ बीपी ३६१२ या क्रमांकाची नविन शाइन गाडी चोरुन नेली असून याच दिवशी दोन क्विंटल लोखंडी सळाख चोरल्याची घटना घडली आहेत. मागील दोन महिन्यांपासून चोरीच्या घटनेत वाढ होत असून नागरिकांनी अधिक दक्षता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. #Theft
    जिल्ह्यातील दारुबंदी उठल्यानंतर नांदाफाटा परिसरात चोरीच्या घटनेतही वाढल्याचे दिसत आहे. रात्रीच्या वेळेला नागरिकांच्या घरासमोरील ठेवलेले सिमेंट बॅग, प्लास्टिकचे ड्रम, लोखंडी सळाख, लोखंडी पाइप चोरी जात असल्यामुळे भंगार चोर सक्रिय असल्याचे दिसत आहे. नांदा येथील जलस्वराज्य प्रकल्पाचे घरगुती नळ कनेक्शनचे जवळपास तेरा ते चौदा मीटर चोरट्यांनी लंपास केले आहेत. आवारपुरातील एका अंगणवाडीतील धान्यही चोरुन नेल्याची घटना घडली आहे. नांदाफाटा परिसरात दिवसागणिक चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असल्याने नागरिक दहशतीमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी नांदा गावातून भोयर यांच्या मालकीची मोटारसायकल ही चोरीला गेली होती.
   
आता दिनांक २१ जुलैच्या रात्रीला चोरट्यांनी दिवे कॉलनीतून अनंता नरुले यांची होंडा कंपनीची काळ्या रंगाची नविन गाडी लंपास केली आहेत या संबंधाने पोलिस स्टेशन गडचांदूर तक्रार दिली असून अद्याप पावतो गाडीचा कुठलाही शोध लागलेला नाही. परिसरातील नागरिकांना या गाडीबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी गडचांदूर पोलीस स्टेशनला कळवावे असे तक्रारकर्ते अनंता नरुले यांनी कळविले आहे. सातत्याने चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. स्थानिक पोलिस प्रशासनाने लक्ष घालून चोरांच्या मुसक्या आवळण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.