Top News

9 ऑगष्टला झाडीपट्टीतील कलावंत करणार वडसा येथे "रंगकर्मी आंदोलन". #Gadchiroli #Chandrapur


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- कोरोनाची दुसरी लाट ओसरताच शासन-प्रशासनाच्या वतीने राज्यात नुकतीच टाळेबंदी मध्ये शीथीलता करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने व्यापाऱ्यांची प्रतिष्ठाने, मॉल, जीम, पार्लर सोबतच अनेक गोष्टी शीथील करण्यात आल्या. पण शिथील करण्यातयात आलेल्या गोष्टींमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून बंद पडलेले थीएटर्स, सांस्कृतीक कार्यक्रम, नाट्यप्रयोग इत्यादींचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे समस्त कलावंतांच्या व्यथा, वेदना शासनापर्यंत पोहचाव्यात, सोबतच राज्यव्यापी होत असलेल्या रंगकर्मी आंदोलनाला पाठींबा म्हणुन झाडीपट्टीतही आंदोलन व्हावे, याकरीता 4 ऑगष्टला ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले होते. #Gadchiroli #Chandrapur
सभेत प्रमुख उपस्थीत जेष्ठ कलावंत प्रा. डॉ. शेखर डोंगरे, अनिरुद्ध वनकर, मुकेश गेडाम, हिरालाल पेंटर, परमानंद गहाने, नितु बुद्धे, ताजुल ऊके, किरपाल सयाम, यासोबतच अनेक कलावंतांनी आपले विचार व्यक्त केले. सभेचे सुत्रसंचालन भास्कर पिंपळे यांनी केले. येत्या 9 ऑगष्टला झाडीपट्टीची नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडसा येथे एक मोठे आंदोलन करावे अशी उपस्थीत सर्व कलावंतांनी एकमुखी निर्णय घेतला.
गेल्या अठरा महिन्यांपासुन टाळेबंदीमुळे झाडीपट्टीतील नाट्यप्रयोग बंद असल्यामुळे येथील कलावंतांचा रोजगार हिरावला गेला. झाडीपट्टीतील नाटकांच्या भरोश्यावरती कलावंतांसोबतच संगीतकार, नेपथ्यकार, डेकोरेशनवाले, आणि रंगभूमीत काम करनाऱ्या अनेकांचे उदरनिर्वाह हे नाट्यप्रयोगावरच अवलंबून असल्यामुळे आज त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. परंतु शासन-प्रशासनातर्फे त्यांची कुठेही दखल घेण्यात आलेली नाही.
एकीकडे आज सर्वच राजकीय पार्टीचे मोर्चे, मेळावे, आंदोलन, सभा ह्या प्रचंड गर्दीत सुुरु आहेत, परंतु कलावंतांच्या कार्यक्रमांना मात्र परवानगी नाकारण्यात येते. आणि म्हणुन शासनाचे लक्ष वेधण्याकरीता येत्या 9 ऑगष्टला क्रांतीदिनाचे औचित्य साधुन संपुर्ण महाराष्ट्रातील विवीध जिल्यात "रंगकर्मी आंदोलन" करण्यात येत आहे. आणि त्याच आंदोलनाला प्रतीसाद म्हणुन झाडीपट्टीतील समस्त रंगकर्मींच्या वतीने वडसा येथे "महाआंदोलन" करण्यात येत आहे. वडसा येथील नाकाडे चौकात सर्व कलावंत एकत्र येऊन शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत शांततेत "नाट्यगीरी" करत तहसील कार्यालयाकडे जानार आहे. तहसील कार्यालय परीसरात पोहचल्यानंतर झाडीपट्टीच्या नांदीने आंदोलनाची सुरवात होईल, "टाळेबंदीमुळे कलावंतांच्या व्यथा" या विषयावरती पथनाट्य, गीतगायन, जेष्ठ रंगकर्मींचे मनोगत, त्यानंतर कलावंतांचे एक शिष्टमंडळ तहसीलदार साहेबांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवाव्यात येईल. व त्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात येईल. इत्यादी संपुर्ण आंदोलनाचे स्वरुप असेल.
 
       सदर रंगकर्मी आंदोलनाला जास्तीत जास्त कलावंत, संगीतकार, नेपथ्यकार, डेकोरेशनवाले, रंगभुमीचे मॅनेजर, गाडी चालक-मालक तसेच रंगभुमीशी संबंधीत सर्वांनी मोठ्या सख्येने ९ ऑगष्टला वडसा येथे सकाळी 10 वाजता उपस्थीत राहुन आपल्या व्यथा शासनाच्या निदर्शनात आणाव्या, असे आवाहन झाडीपट्टी रंगकर्मी आंदोलन संघर्ष समीतीच्या वतीने करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने