Top News

उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक. #Accident


अपघातात युवकाचा जागीच मृत्यू.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी पासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवी राईस मिल जवळ उभ्या असलेल्या ट्रकला नागभिड कडून ब्रम्हपुरी कडे येणाऱ्या दुचाकीस्वाराने मागवून धडक दिली त्यात दुचाकी स्वार जागीच मरण पावला. #Accident
सविस्तर वृत्त असे की, ब्रम्हपुरी नागपूर रोडवर साईघाटा कॉलनी जवळ देवी राईस मिल येथे धान्य भरण्यासाठी आलेला ट्रक हा रोडच्या साईडला उभा असताना नागभिड कडून ब्रम्हपुरी कडे येणारा दुचाकीस्वार सिद्धार्थ आसाराम मडावी वय 21 वर्ष रा नागभीड आपली दुचाकी MH 34 BU 9910 भरधाव वेगाने चालवून ब्रम्हपुरी कडे येत होता. त्यात त्याचे दुचाकी वरून नियंत्रण सुटल्याने त्याने उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली त्यात तो जागीच मरण पावला.
घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनला कळवल्यावर सदर घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने