अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार एक जखमी. #Accident

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- पोंभुर्णा वरून नवेगाव मोरे येथे दुचाकीवरून जात असताना दुचाकी ला अज्ञात वाहणाने धडक दिल्याने एक दुचाकीस्वार ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना पोभुर्णा तालुक्यातील वेळवा गावाजवळ काल सायंकाळच्या सुमारास घडली. #Accident


मृतकाचे नाव ज्ञानेश्वर पुरुषोत्तम दिवसे वय २८ वर्षे तर दिलीप गौरकार गंभीर जखमी असुन ते नवेगाव मोरे येथील रहिवासी आहे. जखमी ला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन केले, पुढील तपास पोलिस करीत आहेत. नवेगाव मोरे येथे शोकाकुल वातावरणात ज्ञानेश्वरच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. #Adharnewsnetwork
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी असा आप्त परिवार आहे.