🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

क्रिकेट बुकींच मोठं रॅकेट पोलिसांच्या हाती. #Betting


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- क्रिकेट या खेळातून कोट्यवधी रुपये कमविण्यासाठी ऑनलाइन सट्टा उदयास आला असून IPL च्या हंगामावेळी ह्या बाजारात हजारो कोटी च्या घरात उलाढाल होत असते. #Betting
भारतात सट्टा प्रतिबंधित असतांनाही छुप्या व ऑनलाइन पध्द्तीने हा व्यवसायाने जोर पकडला आहे.हा व्यवसाय करणारे देशातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात असतात, अँड्रॉइड मोबाईल मध्ये क्रिकेट सट्ट्याची एप डाउनलोड करीत यावर COIN द्वारे पैसे लावले जातात.
असाच एक प्रकार गडचिरोली जिल्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे.चंद्रपूर निवासी राकेश कोंडावार व महेश अल्लेवार , राजीक याला अहेरीत अटक करण्यात आली असून राकेश याने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात त्याने आपले एजंट नेमले आहे.
सदर अटक ही एका मोठ्या प्रकरणाच्या माध्यमातून करण्यात आली आहे, राकेश कोंडावार कडून लाखो रुपयांची रोख रक्कम व कागदपत्रे सुद्धा जप्त करण्यात आली असून आतापर्यंत या प्रकरणात 10 ते 11 जणांना अटक करण्यात आली असून अजून चंद्रपुरातील प्रफुल , शरद , श्याम , राकेश नामक युवकाचा पोलीस शोध घेत आहेत.अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
यामध्ये चंद्रपुरात गडचिरोली पोलिसांनी क्रिकेट बुकी राजीक याला अटक करून गडचिरोली येथे नेण्यात आले.या व्यापाराचे तार संपूर्ण विदर्भात पसरले असून सदर प्रकरणात मोठे मासे गळाला लागणार असल्याची माहिती आहे.याबाबत गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस प्रशासन संपूर्ण प्रकरणाची अधिकृत माहिती देणार आहे.