Top News

चेक बल्लारपूर येथील ग्रामपरीवर्तन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वृक्षांचा वाढदिवस साजरा. #Birthday #tree


१५ ऑगस्ट २०२० ला गावात केले होते वृक्षारोपण.
पोंभुर्णा:- आपण आपला वाढदिवस साजरा करतो, पण तुम्ही कधी झाडांचा वाढदिवस साजरा करण्याचा विचार केलाय का? दि. १५ ऑगस्ट ला पोंभुर्णा तालुक्यातील चेक बल्लारपूरात वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे महत्व लक्षात घेत चेक बल्लारपूर येथील ग्रामपरीवर्तन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वृक्षांचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Birthday #tree
चेक बल्लारपूर येथील ग्रामपरीवर्तन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दि. १५ ऑगस्ट २०२० (७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने) चेक बल्लारपूर येथे वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले होते. यावर्षी दि. १५ ऑगस्ट २०२१ ला ते वृक्ष एक वर्षाचे झाले, म्हणून गावातील युवकांनी वृक्षांचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. #Adharnewsnetwork
आपण जसे आपल्या लेकराला वाढवतो त्याचे पालन पोषण करतो, त्याला काय पाहिजे काय नाही जसे लक्ष देतो. ह्या वृक्षाचे पण देखभाल करीत हे वृक्ष वाचले, व त्याला वेळोवेळी पाणी, खत दिले, सोबतच त्या वृक्षाच्या अवती-भवती लोखंडी तारेची कूपन करून त्यांना काळजीपूर्वक त्याच्या वर लक्ष दिले, येणाऱ्या नविन पिढीला हे वृक्ष गावात येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांना या विविध प्रकारचे वृक्ष फायद्याचे ठरणार आहे.
ग्रामपरीवर्तन बहुउद्देशीय संस्था
चेक बल्लारपूर ता. पोंभुर्णा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने