स्वातंत्र्यदिनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन. #Blood(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील आॅल रिलिजन युथ क्लब तर्फे येथील हुतात्मा स्मारकामध्ये भव्य शासकीय रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. डेंगू या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करणे हा या रक्तदान शिबिराच्या आयोजनाचा हेतू होता.#Adharnewsnetwork
कार्यक्रमाला ऑल रिलीजन युथ क्लबचे अध्यक्ष नितेश भाऊ बानोत, शासकीय रुग्णालय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नितेश भाऊ बानोत यांनी युथ क्लबची भूमिका मांडली. 'ऑल रिलीजन युथ क्लब भद्रावती’ने युवकांसाठी सुरू केलेले व्यासपीठ म्हणून ‘रिलीजन युथ क्लब’ नावारुपास येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.शासकीय अधिकारी यांनी रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले. शिबिरात ऑल रिलीजन युथ क्‍लबच्या ५० सदस्यांनी रक्तदान केले. सामान्य जनतेस मदतीचा हात मिळावा हाही या शिबिरामागचा हेतू होता. यावेळी ऑल रिलिजन युथ क्लबचे सदस्य जयंत बेरड,आतिश डोंगरे,जय राजभर,रविभाऊ मोजे,अभिजीत भुसारी, सौरभ काकडे, अजित अवताडे, भूषण पारखी,राहुल तोडासे, अनिकेत चाफले,अक्षय गड्डमवार,अंकित भोंडे, मनिष मडावी,विनायक माडोत,महेश तेजावत यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता परिश्रम घेतले. #Blood

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या