कुनघाडा रै येथील विश्वशांती विद्यालयात बाल लैंगिक अत्याचार जनजागृती शिबिर. #Chamorshi #police


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- बालकांवर लैगिक अत्याचार या सारख्या गुन्ह्यामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत असल्याने त्यांना लैगिक अत्याचारापासून मुक्त करून, स्वच्छ समाज प्रवाहात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक समीर शेख यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिलडा यांच्या संकल्पनेतून चामोर्शी पोलिस स्टेशनच्या वतीने बाल लैगिक अत्याचार जनजागृती शिबिराचे आयोजन केले जात आहे. #Chamorshi #police
पोलीस ठाणे चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या कुनघाडा रै येथील विश्र्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच बाल लैगिक अत्याचार जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे, प्राचार्य मदन मेश्राम, पोलीस पाटील दिलीप शृंगारपवार, प्रमोद फुलबांधे, पो. ह. संदीप भिवनकर, अरुण सातपुते, शिक्षिका ननावरे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. #Adharnewsnetwork
यावेळी शाळेतील 14 ते 16 वयोगटातील विद्यार्थींना पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे, संदीप भिवणकर यांनी उपस्थित बालकांना लैंगिक अत्याचार पासून संरक्षण अधिनियम २०१२ मधील कायद्याच्या तरतुदी बाबत तसेच भारतीय दंडविधान संहिता (आयपिएस) महिला अत्याचार संदर्भातील गुन्ह्यातील तरतुदी बाबत मार्गदर्शन केले. व विद्यार्थीच्या मनातील समस्या बाबत शंकांचे निराकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रमोद फुलबांदे यांनी केले तर आभार पोलीस विभागाचे संदीप भिवरकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला शाळेतील बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत