(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- कोरपना तालुक्यातील बोरगाव इरई येथे नागरिकांना शासनाच्या विविध शासकीय योजनांच्या संदर्भात मार्गदर्शन करणयात आले.समाजात जीवन जगत असताना मनुष्याचेसुद्धा समाजाप्रति काही देणं लागत असत,त्यामुळे आपण प्रत्येक गोर-गरीब व्यक्तींची मदत केली पाहिजे, तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सतत प्रयत्नशील असले पाहिजे,व आपल्या राज्यघटनेने सर्वांना समान न्यायाचा अधिकार प्रदान केला आहे,त्यामुळे आपल्या समाजातील प्रत्येक वंचित घटकाला न्याय मिळाला पाहिजे तेव्हाच आपल्यामध्ये आदर्श समाजाची निर्मिती होईल असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी केले. #Korpana #BJYM
समाजातील वंचित घटकाला न्याय मिळाला पाहिजे:- भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने.
बोरगाव येथे नागरिकांना संजय गांधी निराधार योजना,रेशन कार्ड,प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, यासाठी लागणारे कागदपत्रे यांची माहिती देण्यात आली.तसेच गावातील नागरिकांच्या समस्यासुद्धा जाणून घेण्यात आल्या.तसेच शेतकऱ्यांच्या शेतात रानटी डुक्कर व रोही यापासून नाहक त्रास होत असून यामुळे शेतातील पिकांची नासाडी होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.त्याकरिता आपण वनविभागाकडे पाठपुरावा करू असे यावेळी आशिष ताजने यांनी सांगितले. #Adharnewsnetwork
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत