Click Here...👇👇👇

आबेंझरी येथील ग्रामपंचायत भवनाचे माजी आमदार संजय धोटे यांच्या हस्ते लोकार्पण. #Dedication #jivati

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- अती दुर्गम भाग म्हणुन ओळखला जानात्या जिवती तालुक्यातील आबेंझरी येथिल ग्राम पंचायत लोकार्पण सोहळा राजुरा विधान सभा क्षेत्राचे माजी आमदार संजय भाऊ धोटे जिल्हा परिषद सदस्य सौ गोदावरीताई केंद्रे पंचायत समिती सभापती सौ अंजनाताई पवार यांच्या उपस्थितीत रिबीन कापुन करण्यात आले. #Dedication #jivati

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार संजय धोटे प्रमुख अतिथी जिवती पंचायत समिती सभापती सौ.अंजनाताई भीमराव पवार जिल्हा परिषद सदस्या सौ.गोदावरीताई केंद्रे विमुक्त भटक्या जमाती जिल्हा संयोजक सुरेशजी केंद्रे पाटण ग्रामपंचायतचे उपसरपंच भीमराव पवार गट विकास अधिकारी मा.आस्कर साहेब आबेंझरी ग्रामपंचायत सचिव मा. मिश्रा साहेब बालाजी भुत्ते, न्यानोबा येलकेवाड माधव नवले बालाजी जाधव संजय पवार शिक्षक कर्मचारी अंगणवाडी सेविका आदीची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे संचालन बोरुळे सर तर आभार प्रदर्शन जांभूळकर सर यांनी केले. #Adharnewsnetwork