Top News

कन्हाळगाव येथील वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करावा. #Electricity

वंचित बहुजन आघाडीची मागणी; कनिष्ठ अभियंता यांना दिले निवेदन.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभीड:- नागभीड तालुक्यातील कन्हाळगाव येथील विद्युत पुरवठा मागील काही महिन्यापासून वारंवार खंडित होत असल्यामुळे गावातील गरोदर महिला,लहान मुले,आजारी व्यक्ती,विद्यार्थी तसेच गावातील समस्त नागरिकांना वातावरणात निर्माण झालेल्या प्रचंड उकाड्याचा,डासांपासून होणारा प्रचंड त्रास मुकाट्याने सहन करावा लागत आहे. दरम्यान विज कंपनीने विशेष लक्ष घालून विज पुरवठा सुरळीत करावा. अशी मागणी वंचित बहुजन आघाडी शाखा कन्हाळगाव (सोनुली)च्या वतीने करण्यात येत असून याबाबतचे निवेदन सावरगाव येथील विज वितरण कार्यालयाचे कनिष्ट अभियंता श्री बोंडे यांना देण्यात आले आहे.#Adharnewsnetwork
सावरगाव वरून 3 कि.मी. अंतरावर कन्हाळगाव हे आडवळणावर गाव आहे. येथे मागील काही महिन्यांपासून वारंवार विज पुरवठा खंडित होत आहे.बुधवारी सुद्धा रात्रभर विद्युत पुरवठा खंडित झाला होता. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही. यामुळे गावातील गरोदर महिला,लहान मुलें,रुग्ण,तथा संपूर्ण गावातील नागरिकांना काळोखाचा, डासांचा, किड्यांचा आणि वातावरणात एकाएक निर्माण झालेल्या प्रचंड अशा उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.शिवाय कोरोना महामारीचा ससेमीरा तर आहेच आणि आता अलीकडे आलेला 'डेल्टा' या नव्या वायरसने सुद्धा मनुष्याला पछाडणे सुरु केले आहे.यामध्येच वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामवासीय त्रस्त झाले आहेत. यामुळे गावात विविध आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यां सर्व बाबीचा विचार करून पुढे विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची हमी वीज वितरण कंपनीने घ्यावी. व वीज पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत करावा. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने सावरगाव वीज वितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता श्री बोंडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन सादर करताना शिष्टमंडळात, वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव शैलेंद्र बारसागडे, शाखा अध्यक्ष चंद्रभान रामटेके, शाखा सचिव सदानंद डेकाटे, ज्येष्ठ कार्यकर्ता वासुदेव खोबरागडे, हरिदास खोब्रागडे, विलास सोनुले, अशोक बोरकर, गौरीशंकर चावरे, श्रावण कोसरे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.#Electricity

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने