Top News

मोखाळा येथे शेतकरी दिनाचे आयोजन.#Farmer



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) कु. पौर्णिमा फाले, सावली
सावली:- पद्मश्री डॉ. विठ्ठल राव विखे पाटील यांनी कृषि क्षेत्रात व शेतकरी हितार्थ केलेल्या कार्याचे स्मरणार्थ राज्यात त्यांचे जन्मतिथीवर नारळी पौर्णिमेला दरवर्षी शेतकरी दिन साजरा केला जातो.#Adharnewsnetwork
याच अनुषंगाने नारळी पौर्णिमेच्या पवांनिमीत्य सावली तालुक्यातील मौजा मोकळा येथे शेतकरी दिनाचे आयोजन ग्रामपंचायत सभागृहात तालुका कुषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांचे मागंदशँनात करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच सुरेश गोडसेलवार होते. पोलीस पाटील गोवर्धन, महादेव कालसर, ग्रामस्थ शेतकरी व प्रतिष्ठित नागरिक तथा ग्रामपंचायत सदस्य हजर होते. यावेळी कृषी पर्यवेक्षक दिनेश पानसे यांनी भात पिकावरील किड व रोगाची माहिती व त्यावरील जैविक उपाय तसेच नाडेप कंपोष्ट ,गांडूळ खत युनीट, दशपर्नी अर्क, निंबोळी अर्क, ई-पिक पाहणी ॲप, कृषिक अँप,घरच्या घरी मेटॉरायझियम द्रावण तयार करणे, तूर शेंडे खुडणी व कृषि विभागाच्या योजनाची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांसोबत संवाद साधून शंका समाधान केले. कार्यक्रमाचे संचालन खंडू काळे कृषी सहाय्यक यानी केले, तर आभार प्रदीप जोंधळे यांनी मानले. प्रसंगी गौतम मेश्राम कृषी सहाय्यक, योगाजी नागोशे कृषीमित्र यांनी सहकार्य केले.#Farmer

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने