नात्या पलिकडचा ऋणानुबंध जोपासत माजी आमदार निमकर यांनी दरवर्षी प्रमाणे जिवती तालुक्यातील आदिवासी बहिणींकडून केले रक्षाबंधन.#Rakshabandhan

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- माजी आमदार सुदर्शन निमकर हे 2003 मध्ये आमदार असतांना रक्षाबंधनाच्या दिवशीच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जिवती तालुक्यातील आदिवासी बहुल खडकी व हिरापूर या गावांत गेले असता या दोन्हीगावतील आदिवासी भगिनींनी रक्षाबंधनाचे पवित्र नाते जोपासत कोणतीही पूर्वतयारी नसतांना खडकी येथील गोदाबाई भीमराव मडावी व हिरापूर येथील अंजनाबाई जंगु सोयाम यांनी निमकरांना राख्या बांधल्या.#Adharnewsnetwork 


तेंव्हापासून श्री निमकर हे सख्या बहिणीसारखं नातं जोपासत 18 वर्षांपासून अविरतपणे आपल्या सहकाऱ्यांसोबत वरील गावात जाऊन आदिवासी भगिनीकडून राख्या बांधून त्यांना साळी चोळी भेट देऊन अभिनंदन करतात. यानिमित्तानं दोन्ही गावात बहीण भावाच्या ऋणानुबंधाच वातावरण निर्माण होऊन या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात सर्व महिला भगिनी व बांधव तसेच बालगोपाल सहभागी होत असल्यामुळे उत्सवाचं वातावरण निर्माण होत असते. आज रविवार दि.22 ऑगस्ट 2021 रोजी माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, विमाशी संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक एस. बी. चंदंनखेडे, भोक्सापूर ग्रा. पं.चे उपसरपंच गोविंद मिटपल्ले, खडकी चे माजी सरपंच भीमराव पाटील मडावी वयोवृद्ध प्रतिष्ठित मारू पाटील गेडाम, सुभाष राठोड, नारायण जाधव, इमाम खान पठाण, जंगु पाटील सोयाम, पंढरी सलगर, तिरुपती पोले, पाटण येथील प्रभाकर पा. उईके, जयदेव आत्राम महाराज, सचिन उत्तरवार, सलमान खान पठाण सह मोठ्यासंख्येने नागरिक सहभागी झाले होते. याप्रसंगी खडकी येथील वयोवृद्ध आदिवासी समाजातील प्रतिष्ठित नागरिक मारू पा. गेडाम यांचा माजी आमदार निमकर यांनी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.#Rakshabandhan