जाहिरात... Advertisement... विज्ञापन

"गोंडवाना"चे विद्यार्थी राहणार पीजी अभ्यासक्रमांपासून वंचित. #Gandwanauniversity #students #PGcourses


गाेंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिवांची वाचा प्रतिक्रिया.

गडचिराेली:- नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ४ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. राज्यातील इतरही काही विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मुदत पुढच्या महिन्यात संपणार आहे; मात्र गाेंडवाना विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अजून परीक्षाच सुरू आहेत. #Gandwanauniversity 
त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा निकाल लागेपर्यंत इतर विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेशद्वार बंद होणार आहे. परिणामी, हजारो विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. #students #PGcourses
काेराेनाच्या संकटामुळे सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. त्यात यावर्षी गोंडवाना विद्यापीठ अजूनच माघारले. २०२०-२१ या शैक्षणिक सत्राच्या अंतिम परीक्षा गाेंडवाना विद्यापीठाने १० ऑगस्टपासून घेण्यास सुरुवात केली. ३१ ऑगस्ट राेजी शेवटचा पेपर आहे. निकाल घाेषित हाेण्यास पुन्हा एक महिन्याचा कालावधी लागेल; मात्र रा.तु.म. नागपूर विद्यापीठाने यापूर्वीच परीक्षा आटाेपल्या असून, निकालही घाेषित केले आहेत. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी २७ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. #Adharnewsnetwork
प्रवेश अर्ज भरण्यापासून राहणार वंचित...

गाेंडवाना विद्यापीठातील अनेक विद्यार्थी नागपूर विद्यापीठात प्रवेश घेण्यास इच्छुक राहतात. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अर्ज करताना पदवीच्या अंतिम परीक्षेचे गुण भरावे लागतात; मात्र गाेंडवाना विद्यापीठाचे निकालच लागले नसल्याने प्रवेश अर्जात गुण भरता येणार नाही. त्यामुळे अर्जही स्वीकारला जाणार नाही.
नागपूर विद्यापीठाबराेबरच इतरही विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्याही विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येणार नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. दुसरे विद्यापीठ प्रवेशासाठी मुदतवाढ देतील व गाेंडवाना विद्यापीठाचे निकाल लवकर लागतील, अशी अपेक्षा विद्यार्थी व पालक करीत आहेत.

गाेंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर ३१ ऑगस्टला आहे. ५ सप्टेंबरला निकाल लावण्याचा प्रयत्न विद्यापीठ करणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नागपूर विद्यापीठाने ४ सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली असली तरी त्याला एक ते दीड महिन्याची मुदतवाढ मिळू शकते. दरवर्षीच अशी मुदतवाढ दिली जाते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.
डॉ.अनिल चिताडे, प्रभारी कुलसचिव,
गाेंडवाना विद्यापीठ, गडचिराेली.

साभार.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत