सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुका पोंभुर्णा यांची निवेदनातून मागणी.
पोंभुर्णा:- कोरोणा महामारीने संपूर्ण भारतात हाहाकार माजला असतांना महाराष्ट्रातील शाळा मागील अनेक दिवसांपासून बंद होत्या.दुसरी लाट ओसरली असतांना जनजीवन सुरळीत चालू झाले आहे. आता पुर्ववत शाळा सुरू होतांना दिसत आहेत. पण अनेक शाळांमध्ये शुद्ध पाण्याची सोय उपलब्ध नाही,त्यामुळे विद्यार्थ्यांना बोरवेल चे पाणी प्यायला भाग पडते आहे,त्यामुळे विद्यार्थी आजारी पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही,यासाठी शाळेत शुध्द पाणी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुका पोंभुर्णा यांच्या वतीने जनता विद्यालय पोंभुर्णा येथील मुख्याध्यापक श्रि.बघेल सर यांना निवेदनाद्वारे केली आहे. #Pombhurna
अनेक दिवसांनंतर शाळा सुरू होत आहे काही विद्यार्थी शाळेत येत आहेत तर काही विद्यार्थी येणार आहेत,त्या विद्यार्थ्यांना शुध्द पाणी उपलब्ध नसल्याने बोरवेल चे पाणी प्यायला भाग पडत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे बघता शाळेमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणा बसवुन विद्यार्थ्यांना शुध्द पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना लोकेश झाडे,अध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुका पोंभुर्णा,भावेश दुर्योधन महासचिव, अंकुश चांदेकर उपाध्यक्ष, वंचित बहूजन आघाडी चे रवि तेलसे,तालुका महासचिव,अतुल वाकडे,युवा तालुका अध्यक्ष, अविनाश कुमार वाळके जिल्हा प्रमुख आय टी सेल चंद्रपूर,निश्चल भसारकर,पराग उराडे,सत्कार फुलझेले,अक्षांत कवठे,प्रशिक मानकर, व सम्यक विद्यार्थी आंदोलन चे कार्यकर्ते उपस्थित होते. #Adharnewsnetwork