जाहिरात... Advertisement... विज्ञापन

गोंडपिपरीत पंधरा वर्षीय युवकाची आत्महत्या. #Suicide


कुटुंबियांच्या मदतीला धावले संदीप करपे.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- गोंडपिपरीतील माता वार्ड येथील मयंक राकेश मेश्राम वय (१५) दि.२५ गुरुवारी रात्री १० च्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. तरुण मुलाच्या आत्महत्येने अवघे समाजमन सुन्न झाले. #Suicide
घरची परिस्थिती अतिशय बिगट मृतकाचे वडील सफाई कामगार असून कोरोनामुळे घरात अठरा विश्वे दारिद्र हातावर आणून पानावर खाणे अशी परिस्थिती मेश्राम कुटुंबियांची असून मुलाच्या आत्महत्येने कुटुंबावर आभाळ कोसळल्यागत स्थिती निर्माण झाली. #Adharnewsnetwork
अशावेळी गरीब कुटुंबातील युवकाच्या आत्महत्येनंतर मेश्राम कुटुंबियांना खचुन न जाता नव्या उमेदीने त्यांना उभे राहता यावे अंत्यविधी करिता हातभार म्हणून सामाजिक भावनेतून शिवसेना जिल्हा उपप्रमुख माजी जी प उपाध्यक्ष संदिप करपे मेश्राम कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहिले. ५००० रुपयांची मदत पाठवली.शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मेश्राम कुटुंबियांची सत्वनपर भेट घेतली व मदत पोहचवली यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार,आनंदराव गोहणे,अशपाक कुरेशी,बब्बू पठाण,रमेश नायडू उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत