(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- बरेच दिवसापासून कॉविड १९ च्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात लॉकडाउनची परिस्थिती होती ,आता राज्य शासनाने लॉकडाउन मध्ये लागलेले बरेच निमय व अटी शिथिल केले आहे ,चंद्रपूर जिल्ह्यात हर ठिकाणी आठवडी बाजार बंद होते आता जिल्हा प्रशासनने आठवडी बाजारावरचे निमय व अटी शिथिल केले आहे आणि त्यांना बाजारासाठी परवानगी पण दिली आहे परंतु जिल्ह्यात अनेक ठिकाणी बाजाराला परवानगी असून राजुरा शहरात आठवडी बाजाराला अद्याप परवानगी मिळाली नाही.#Adharnewsnetwork
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे, युवासेना जिल्हाप्रमुख निलेशभाऊ बेलखेडे यांचा मार्गदर्शनाखाली व युवासेना शहर चिटणीस, राजुरा स्वप्निल मोहुर्ले यांचा नेतृत्वात जिल्हाधिकारी साहेबांना तहसीलदार साहेब, राजुरा यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. आठवडी बाजार सुरु करण्याबाबत तहसीलदार साहेबानं सोबत चर्चा करून तालुक्यातील ग्रामीण भागातल्या लोकांना सतत होत असलेला त्रास व छोटे व्यापारी यावर अवलंबून असल्याचे माननीय तहसीलदार साहेबचे लक्ष केंद्रित करून निवेदन देण्यात आले. व साहेबांनी लवकरच या विषयावर पाठपुरावा करण्यात येईल अशे सांगितले।i
या प्रसंगी युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर,युवासेना तालुका चिटणीस(संघटक) कुणाल कुडे,ललित लांडे उपस्थित होते.#Yuvasena