आम आदमी पार्टी तर्फे सफाई कर्मचा-याचा सत्कार. #Hospitality

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- आम आदमी पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संयोजक अरविंद केजरीवाल आणि चंद्रपुर जिल्ह्याचे संघटन मंत्री परमजीत सिंह झगळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे न.प.सफाई कर्मचा-याचा सत्कार करण्यात आला.#Adharnewsnetwork
  या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपुर जिल्ह्याचे संघटन मंत्री परमजीत सिंह झगळे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नगर परिषद भद्रावती चे सफाई कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच  नगर परिषद सफाई कर्मचारी यांच्या उपस्तीथीत केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांना मिठाई वाटण्यात आली. त्यानंतर पोलिस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय  व विविध ठिकानी वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
      आम आदमी पार्टी चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचे काम बघुन भद्रावतीचे अजय नेहारे, रमण भाऊ, पवन गंधेवार रा. किल्ला वार्ड, व असंख्य नागरिकांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी उपस्थित पदाधिकारी जिल्ह्याचे संघटन मंत्री परमजीत सिंह झगळे, तालुका अध्यक्ष सोनाल पाटील, तालुका उपाध्यक्ष विनित निमसरकर, तालुका सचिव सुमीत हस्तक, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, मृणाल खोब्रागडे, सुरज शहा, राजू कोटा, दीपक वनकर, नावेद शेख़, राजेंद्र भुक्या, प्रकाश कांबळे, घनशाम गेडाम उपस्थित होते. #Hospitality