(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) कु.पौर्णिमा फाले, सावली
सावली:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, सावली तालुकाचे वतीने गरीब व गरजू विदयार्थी तसेच शेतकरी बांधव यांना छत्री वाटप व पत्रकार संघाच्या नामफलकाचा उद्घाटन सोहळा असा दुहेरी उपक्रम तहसील कार्यालय सावली समोर पार पडला.#Adharnewsnetwork
कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा.महेश पानसे पूर्व विदर्भ प्रांत अध्यक्ष म.रा.म.पत्रकार संघ,
कार्यक्रमाचे अध्यक्ष परिक्षीत पाटील तहसिलदार सावली, डॉ. भीमराव धुर्वे वैदयकीय अधिकारी, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील बोकडे, कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया, वसंतराव कामडी आर.एफ ओ. सावली, राजेश सिद्धम, रजनीताई भडके माजी नगराध्यक्षा, पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य मोरेश्वर उद्योजवार, जेष्ट सदस्य खेमदेव तुम्मेवार, तालूका अध्यक्ष प्रमोद गेडाम, धनंजय मुद्दमवार, योगेश रामटेके, डॉ. सोनवणे, बाबा मेश्राम, सूर्यभान रामटेके, रेवन घेर, चंद्रकांत गेडाम, उमेश वाळके, आदी पत्रकार संघाचे पदाधिकारी व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते १०० हून अधिक छत्रीचे वितरण करण्यात आले.
प्रा.महेश पानसे यांनी पत्रकार व संघ पदाधिकारी यांना आपला वाढदिवस डिजिटल फलक न लावता समाज उपयोगी कार्यक्रम करण्याचे आवाहन याप्रसंगी केले.#Program