(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- भद्रावती शहरात चौका-चौकात अनाधिकृत
बि-बियाने विक्री होत असुन या बि- बियाने विक्रेत्यांनवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरज भेले यांनी येथील तहसीलदारांमार्फत जिल्हा अधिका-यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्हाधिका-यांना पाठविलेल्या निवेदनात सुरज भेले यांनी म्हटले आहे की, भद्रावती शहरात चौका-चौकात अनधिकृत बियाने विक्रते बियाने विक्री करत असल्यामुळे परवाना धारक कृषी सेवा केंद्रांना याचा फटका बसतो. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते. तसेच हे बियाने विक्रते चौकातील ऐन कार्नवर दुकान थाटुन बसतात. त्यामुळे रहदारीला अळथडा निर्माण होतो.
वाहने वळविताना या दुकाना मुळे नागरिकांना अडचण निर्माण होते.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारत येत नाही. तसेच या अनाधिकृत बियाने विक्रत्या कडून घेतले बि- बियानांना अंकुर येत नाही. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याने अशा अनधिकृत बियाने विक्रत्यावर कारवाई करून हे बियाने कुठून आणले आहे याची चौकशी करून त्यांचावर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी सुरज भेले यांनी केली आहे.
निवेदन सादर करताना सोशल मिडाया प्रभारी सुरज बाराहाते, दिनेश धारा, मयुर पेंदोर, तेजस कापगते, मिलिंद रामटेके, अक्षय पाटील, नैतिक बिंजवे उपस्थित होते. #Sellseeds