भाजपा युवामोर्चाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. #Shivsena


विधान परिषद उपसभापती डॉ. निलमताई गिर्हे व शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थीत.

जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वाखाली युवामोर्चाचे घोसरी प्रमुख सुधिर वडपल्लीवार बांधले शिवबंधन.

पोंभुर्णा:- शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून घोसरी येथील भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे यांचे खंदे समर्थक, युवामोर्चाचे घोसरी प्रमुख सुधिर वडपल्लीवार यांनी भाजपा युवामोर्चाच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीला रामराम करत शिवबंधन हाती बांधले आहे. #Adharnewsnetwork
शिवसेनेचे आशिष कावटवार व गणेश वासलवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले. यावेळी मोठ्या प्रमाणात युवा वर्गाचा समावेश होता. जिल्हाप्रमुख संदिपभाऊ यांच्या नेतृत्वाखाली पोंभुर्णा तालुक्यात शिवसेनेचा झंझावात जोरदारपणे सुरू असून कार्यकर्ते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. #Chandrapur
शिवसेना हा जनमानसातील तळागाळातल्या प्रत्येक घटकास सोबत राहात समाजकारण करणारा पक्ष असून केवळ आणि केवळ शिवसेनाच सामान्य माणसाला न्याय देऊ शकते म्हणूनच आज आम्ही भारतीय जनता पार्टीला रामराम करत हातामध्ये शिवबंधन बांधले आहे! अशी खणखणीत प्रतिक्रिया प्रवेश करणार्‍या सुधिर वडपल्लीवार यांनी दिली.
यावेळी युवासेनेचे तालुका प्रमुख अभिषेक बद्दलवार,शहर प्रमुख महेश श्रिगिरिवार,महेश लोनबले साहिल पोरटे,नितीन पुषपलवार,सुरज चुधरी,वैभव गुरूनुले,लोकश कोडापे,प्रविण लोनबल्ले,गोलु निकरे,सुधिर पोरेडीवार व आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत