वडीलांच्या उपचारासाठी मंदिराची दानपेटी फोडली. #Theft

Bhairav Diwase

संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानातील प्रकार.

मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर फासले पेंट.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानातील दानपेटी फोडल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. सीसीटीव्हीला पेंट फासून दानपेटी फोडून चोरी करण्यात आली. या चोरीमागील कारण धक्कादायक असल्याचे तपासत उघड झाले आहे. वडिलांच्या उपचारासाठी आरोपीने ही चोरी केल्याचे तपासत उघड झाले आहे. आरोपीच्या कबुलीने पोलीसही चक्रावले आहेत. #Theft

💥अल्पवयीन प्रेमी युगलांची आत्महत्या.

🐍32 वर्षीय इसमाचा सर्पदंशाने मृत्यू!

🪓मुलांसमोर वडिलांवर कुऱ्हाडीने वार.
👇👇👇👇👇👇

🗡️तलवारीच्या वाराने जखमी झालेल्या संदीपचा अखेर मृत्यू.

अवघ्या एका तासात पोलिसांनी या चोरीचा छडा लावत आरोपीला अटक केली. आपल्या वडिलांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या उपचारासाठी आपल्याकडे पैसे नाहीत.तसेच या संकटात आपल्याला मदत करायला कुणीही तयार नाही. त्यामुळे नाईलाजाने मंदिराची दानपेटी फोडून चोरी केल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले. आरोपीने दिलेल्या कबुलीने पोलिसही चक्रावले आहेत. #Adharnewsnetwork
महाराष्ट्र-तेलंगणातील भाविकांचे आराध्य देवस्थान असलेल्या कोंडय्या महाराज मंदिरात यापूर्वीही चारवेळा दानपेटी फोडून चोरी करण्यात आली आहे. मंदिराचे पुजारी शनिवारी पहाटे शेगमवार महाराज महासमाधीची पूजा करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पेंट फासलेले दिसले. तसेच दानपेटी फोडण्यात आल्याचे दिसून आले. याची माहिती धाबा पोलिसांना देण्यात आली. अवघ्या तासाभरात पोलिसांनी चोरीचा छडा लावत आरोपी श्रेयस दुर्गे याला ताब्यात घेण्यात आले. वडिलांच्या उपचारासाठी दान पेटीतून दोन हजारांची चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. पुढील तपास धाबा ठाणेदार सुशील धोकटे करीत आहेत.