Top News

अल्पवयीन प्रेमी युगलांची आत्महत्या. #Suicide

एकमेकाच्या हाताला दोर बांधून वैनगंगा नदीपात्रात घेतली उडी.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील अल्पवयीन प्रेमी युगुलांनी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील शिवनी घाटावर आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना काल शनिवारी (7 ऑगस्ट 2021) ला सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. दोघांनीही एकमेकाच्या हाताला दोर बांधून वैनगंगा नदीपात्रात उडी घेतल्याने त्याच अवस्थेत मृतदेह आढळून आलेत. #Suicide

📮वडीलांच्या उपचारासाठी मंदिराची दानपेटी फोडली.

🐍32 वर्षीय इसमाचा सर्पदंशाने मृत्यू!

🪓मुलांसमोर वडिलांवर कुऱ्हाडीने वार.
👇👇👇👇👇👇

🗡️तलवारीच्या वाराने जखमी झालेल्या संदीपचा अखेर मृत्यू.
सदर प्रेमी युगुल हे ब्रम्हपुरी तालुक्यातील चिंचोली बुजुर्ग येथील आहेत. स्वाती दिलीप मेश्राम (वय १५) व आशिष प्रभू मेश्राम (वय १७) असे मृतांची नावे आहेत. दोघांनीही एकमेकाच्या हाताला दोर बांधून वैनगंगा नदीपात्रात आत्महत्या केली. सदर आत्महत्या हि प्रेम प्रकरणातून केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. #Adharnewsnetwork
स्वाती व दिलीप हे दोघेही ३ ऑगस्ट पासून बेपत्ता होते. दोघांच्याही कुटुंबीयांनी ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन येथे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. दोघांचीही शोध मोहीम ब्रम्हपुरी पोलिसांनी राबविली होती. दरम्यान काल शनिवारी स्वाती व आशिष चा मृतदेह आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर एकमेकाच्या हाताला दोर बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने