Top News

नवी मुंबई विमानतळाला हरित क्रांतीचे प्रणेते मा. वसंतरावजी नाईक यांचे नाव द्या. #Airport

गोर सेनेच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालय समोर लाक्षणिक उपोषण.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- नवी मुंबई विमानतळास हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे सलग साडेअकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले मा.वसंतराव नाईक यांचे नांव देण्यात यावे मा. वसंतराव नाईक यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अत्यंत कठोर निर्णय घेऊन नवी मुंबई हे शहर वसविले आहे शहरामध्ये औद्योगिक विकास झपाट्याने व्हावा म्हणून औद्योगिक विकास महामंडळाला भरघोस निधी देवून विकास कामाला गती दिली मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून भविष्यात हे शहर देशाचे केंद्रबिंदू होणार या दृष्टीने मुंबईचा कायापालट करण्याचे काम त्यांनी केले जागतिक स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे शहर बनवण्यामध्ये मा. वसंतराव नाईक यांचा सिंहाचा वाटा आहे हे कोणीही नाकारू शकत नाही शिवाय हरीत क्रांतीचे स्वप्न पाहताना शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी व वीज मुबलक प्रमाणात मिळावी म्हणून जायकवाडी उजनी,अप्पर वैनगंगा व पेंच इत्यादी पाण्याचे प्रकल्प व कोराडी पारस, परळी खापरखेडा पोफळी व भुसावळ असे विद्युत प्रकल्प उभारले.
महाराष्ट्रात हरित क्रांती करून महाराष्ट्राला देशात एक नंबर वर आणले. हे महाराष्ट्र कधीच विसरु शकत नाही. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हरितक्रांतीचे प्रणेते सलग साडे अकरा वर्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहून महाराष्ट्राची धुरा समर्थपणे सांभाळून देशात महाराष्ट्र राज्याचा गौरव करणाऱ्या महामानवाचे नाव नवी मुंबई विमानतळाला शोभेल व तमाम महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजुरांचे व सामान्य जनतेचे स्वप्न साकार होईल म्हणून नवी मुंबई विमानतळाला मा.वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी लाक्षणिक उपोषनात गोर सेना प्रदेश उपाध्यक्षयक्ष गणेश करमठोट व जिल्हा सचिव बालाजी जाधव यांच्या कडून करण्यात आले.#Adharnewsnetwork


यावेळी प्रामुख्याने उपस्थित गणेश करमठोट- प्रदेश उपाध्यक्ष(महाराष्ट्र राज्य)बालाजी जाधव जिल्हा सचिव चंद्रपूर पंडीत राठोड जिल्हा सहसचिव अशोक जाधव जिल्हा कोषाध्यक्ष राहुल जाधव तालुका संयोजक चंद्रपूर गोपीनाथ चव्हाण सामाजिक कार्यकर्ते विक्की जाधव जिल्हा संघटक अजय जाधव सदस्य रामचंद्र राठोड विशाल पवार प्रदिप पवार गोविंद पवार परमेश्वर चव्हाण आदीची
उपस्थिती होती.#Airport

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने