गोसेखुर्द धरणाचे १७ दरवाजे सुरू. #Dam

नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

भंडारा:- भंडारा जिल्ह्यात तसेच मध्यप्रदेश राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठा वाढला आहे. त्यामुळे आज शुक्रवारी गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी १७ दरवाजे ०.५ मिटरने उघडण्यात आले आहे. यातून २०७०.३२४ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. #Dam

🐅पोंभूर्णा तालुक्यातील भटाळीत वाघाची शिकार.

http://www.adharnewsnetwork.com/2021/09/pombhurna_10.html

मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जलस्तर वाढल्याने वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. काल रात्री धरणाचे २५ दरवाजे उघडण्यात आले आहे होते . मात्र , आज कालच्या तुलनेत पावसाचा जोर कमी असल्याने दुपारी धरणाचे १२ दरवाजे बंद करून १३ दरवाज्यांमधून अर्ध्या मिटरने पाण्याचा विसर्ग सुरू होता. सायंकाळच्या सुमारास पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने धरण प्रशासनाने संभावित धोका टाळण्यासाठी आणखी चार दरवाजे उघडले. त्यामुळे १७ दरवाजे अर्ध्या मिटरने उघडले. यातून २०७०.३२४ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्यात वाढ होत असल्याने भंडारा जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत