मित्रानेच केली मित्राची हत्या. #Murder


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- बालपणीच्या मैत्रीत दारूने एका मित्राचा घात केल्याची धक्कादायक घटना दुर्गापूर येथे 9 सप्टेंबरला घडली. दुर्गापुरात राहणारे 26 वर्षीय अक्षय कातकर व 28 वर्षीय सुरज उर्फ संजय यादव हे दोघेही बालमित्र, लहानपणापासून दोघेही सोबत असायचे, एकमेकांच्या सुख दुःखात नेहमी दोघेही एकत्र असायचे, मात्र 9 सप्टेंबरला दोघेही मद्यप्राशन करून आपल्या दुचाकीने जात होते. #Murder

🐅पोंभूर्णा तालुक्यातील भटाळीत वाघाची शिकार.

संजय दुचाकी वेगात चालवू लागल्याने अक्षय ने त्याला दुचाकी चा वेग कमी करण्याचा सल्ला दिला, मात्र संजय हा ऐकण्याच्या परिस्थिती मध्ये नव्हता, अखेर अक्षयने दुचाकी थांबविण्यास संजय ला भाग पाडले. दुर्गापूर येथील जनता शाळेजवळ संजय ने दुचाकी थांबविली, व दोघांमध्ये दुचाकी वाहनांच्या वेगावरून वाद सुरू झाला, वाद इतका वाढला की वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. संजय ने अक्षय ला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली,
संजय ने अक्षयच्या पोटावर बुक्क्यांचा प्रहार केला, अक्षयला अर्धमेल्या स्थितीत टाकून संजयने घटनास्थळा वरून पळ काढला. सायंकाळी 5 वाजता एकाने अक्षयच्या घरी फोनद्वारे माहिती दिली की अक्षय जखमी अवस्थेत पडलेला आहे, माहिती मिळताच अक्षयच्या आई व बहिणीने तात्काळ जनता शाळेजवळ धाव घेत अक्षयला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृतक अक्षयच्या आईने तात्काळ दुर्गापूर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.तक्रारीची दखल घेत दुर्गापूर पोलिसांनी आरोपी संजय यादव ह्याला अटक केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे ह्याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनोणे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत