Top News

पोंभूर्णा तालुक्यातील भटाळीत वाघाची शिकार. #Pombhurna


बुटीबोरीत अवयव विक्री प्रकरणी झाला खुलासा.

भटारीचे तीन आरोपी अटकेत.

१० वाघ नखे, व मिशीचे ६ केस जप्त.


पोंभूर्णा:- वाघाची शिकार व अवयव तस्करी प्रकरणात बुटीबोरी वनविभागाच्या पथकाने पोंभूर्णा तालुक्यातील भटारी गावतील तीन आरोपींना ताब्यात घेतले असून. १० वाघ नखे, मिशांचे ६ केस, दातं व हाडं आरोपीकडून जप्त करण्यात आले आहे. सदर टोळीने आणखी काही शिकार केले आहेत का या संबंधानेही वनविभाग पुढील तपास करीत आहेत.
वाघाची शिकार व अवयव तस्करी  प्रकरणी बुटीबोरी वनविभागाच्या पथकाने ९ सप्टेंबरला पोंभूर्णा तालुक्यातील भटाळी येथील योगेश तोडासे याला वाघाच्या अवयवाची तस्करी व विक्री करताना बुटी बोरी येथे ताब्यात घेण्यात आले . सदर कार्यवाही बुटी बोरी प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकड यांनी केली.


ताब्यातील आरोपीची कसून चौकशी केली असता वाघाची  शिकार व सहकारी आरोपी यांची त्यांनी माहिती दिली. माहितीच्या आधारे बुटीबोरी वनविभागाने पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे, बल्लारशहा फिरते पथक वनपरिक्षेत्र अधिकारी फनिंद्र गादेवार,राजुरा फिरते पथक अधिकारी वनकर व कर्मचारी यांनी  १० सप्टेंबरला भटाळी गाठून दोन आरोपींना ताब्यात घेतले.त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून १० वाघ नखं, मिशीचे ६ केस, दातं, व हाडं  जप्त करण्यात आले. सोबतच करंट लावून शिकार करण्यात आलेली तारही जप्त करण्यात आली.
घटनेची अधिक चौकशी केली असता सदर वाघाची शिकार करंट लावून करण्यात आली होती. वाघाचे अवयव नखं,दात,मिशी काढून त्यांनी त्याला जाळून टाकले होते.
   
सदर प्रकरणाची चौकशी वनविभागाने सुरू केली आहे. यातून अनेक प्रकार उघडकीस येणार असून वाघाच्या अवयवांची तस्करी करणारे मोठे रॅकेट जाळ्यात सापडणार असल्याची माहिती आहे. भटाळीच्या वाघाच्या शिकार प्रकरणाचे कनेक्शन सिंदेवाहीकडे वळले असून वनविभागाची एक टिम चौकशी करण्याकरिता सिंदेवाहीला रवाना झाली आहे. यातून कोणती माहिती समोर येईल याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
    या घटनेमुळे पोंभूर्णा वनपरिक्षेत्रील वाघांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने