जाहिरात... Advertisement... विज्ञापन

मोहाळी (न) मध्ये दुकानाला भीषण आग. #Fire


सर्व साहित्य जळून खाक.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तालुक्यातील मोहाळी (न) इथे दिनांक ११ सप्टे च्या सकाळी आठ वाजता मोहाली मधील नागरिक असलेले श्री हिरा वाघमारे यांच्या सायकल दुकानाला आग लागली. हिरा वाघमारे यांनी आज सकाळी स्वतःचे व्यवसाय असलेले सायकल रेपेरींग दुकान उघडले व पूजा करण्याकरिता अगरबत्ती लावली पण अगरबत्ती च्या बाजूला ज्वलनशील पदार्थ असल्याने या ज्वलनशील वस्तूने पेट घेतला व काही कळायच्या आतच संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

🐅पोंभूर्णा तालुक्यातील भटाळीत वाघाची शिकार.

 या मध्ये दुकान मालकाचे अंदाजे एक लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे.संबधित या घटनेबाबत पोलिस स्टेशन सिंदेवाही ला कळविण्यात आले माहिती मिळताच पोलिस स्टेशन सिंदेवाही मधील टीम घटना स्थळाकडे रवाना झाली आहे . व अग्निशामक दलाला या बाबत कळविण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण आणले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत