Top News

वरोऱ्यात राजकीय जुगार अड्ड्यावर "राडा". #Warora #politics #Rada #Gambling

शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते अटकेत.

स्वतःच्या धाब्यावर जूव्वा खेळ भरवणे पडले महागात.
वरोरा प्रतिनिधी:- शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्या वरोरा येथील धाब्यावर मागील दोन दिवसापूर्वी जुव्वा भरवला होता तो जुगार जवळपास 10 लाखांचा असल्याची चर्चा असून पाटाला माजरी परिसरातील एका प्रतीक पारखी नामक वेकोली कर्मचारी यांनी या जुगारात जवळपास 8 लाख रुपये जिंकले होते. #Warora #politics

🐅पोंभूर्णा तालुक्यातील भटाळीत वाघाची शिकार.

पण हे पैसे जिंकल्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते आणि त्यांचे इतर सहकारी यांनी प्रतीक पारखी यांना मारहाण करून त्याच्या जवळचे पैसे हिसकावून त्याला पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे जबर जखमी झालेल्या प्रतीकला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र ते वेकोली कर्मचारी असल्याने त्यांना परत वेकोली मांजरी च्या रुग्णालयात दाखल केले. #Rada #Gambling
पण प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूर च्या रुग्णालयात त्याना काल भरती करण्यात आल्याची माहिती असून पोलिसांनी या प्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्यासह त्यांच्या पाच सहकारी यांना अटक केली असल्याची माहिती आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुखांना स्वताच्या धाब्यावर जुगार भरविण्याची परवानगी दिली कुणी? हा गंभीर प्रश्न असून सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी अशा प्रकारचे जुगार क्लब भारवून त्या ठिकाणी पैसे जिंकणाऱ्यांचे पैसे लुटत असतील तर सर्वसामान्य जनतेचे काय? हा प्रश्न आता सत्ताधारी यांना या घटनेच्या निमित्याने जनता विचारत आहे. #साभार

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने