बिरसा फायटर्सच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी विकास शेडमाके. #Appointment


(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभूर्णा:- बिरसा फायटर्सचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन सभेत राज्य पदाधिकारी व विदर्भ प्रमुख यांच्याशी चर्चा करून विकास शेडमाके यांची चंद्रपुर जिल्हाध्यक्ष  पदी निवड करण्यात आली. #Appointment
पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा बुद्रुक येथील विकास शेडमाके सामाजिक कार्यकर्ते आहेत. संघटन कौशल्याचा त्यांना दांडगा अनुभव असून.अनेक सामाज हितैशी काम त्यांनी केले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन त्यांनी अनेकदा आंदोलन केली  आहेत.आदीवासी बहूल पोंभूर्णा तालुक्यातील आदिवासी बेरोजगार तरूणांना रोजगार मिळावा यासाठी शासनाकडे त्यांचा सतत पाठपुरावा सुरू आहे. #Adharnewsnetwork
 यावेळी विकास शेडमाके यांनी बिरसा फायटर्स चे जिल्ह्यात संघटन वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून गाव तिथे कार्यकर्ते हे धोरण आपले राहणार आहे.  जिल्ह्यातील शोषीत, वंचीतांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला समर्थपणे लढा राहिल असेही त्यांनी  सांगितले.
     
      विकास शेडमाके यांची  बिरसा फायटर्स चंद्रपुर  जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याध्यक्ष मनोज पावरा, उपाध्यक्ष राजेश धुर्वे, महासचिव  राजेंद्र पाडवी, महानिरीक्षक केशव पवार, कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी, राज्य प्रवक्ता रोहित पावरा, कोषाध्यक्ष दादाजी बागूल, प्रसिद्धी प्रमुख हसन तडवी , नाशिक विभाग अध्यक्ष विलास पावरा, धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा, ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव, नंदुरबार जिल्हाध्यक्ष साहेबराव कोकणी , पुणे जिल्हाध्यक्ष कृष्णा भंडारी,कोकण विभाग अध्यक्ष  राजाभाऊ सरनोबत, विदर्भ प्रमुख सुरेशकुमार पंधरे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत