जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पेंढरी मक्ता तंमुस अध्यक्षपदी लखन मेश्राम यांची निवड. #Appointment


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी लखन मोरेश्वर मेश्राम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथे 13 सप्टेंबर ग्रामसभा पार पाडण्यात आली. यावेळी ग्रामसभेमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली . यात गावातील युवा आदर्श , तरुण आदर्श व्यक्तिमत्व, दैनिक नवराष्ट्र चे पाथरी प्रतिनिधी , लखन मेश्राम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामसभेला उपस्थित ठुमदेवी वलादे सरपंच, मुखरू शेडमाके पो.पा, अंजु बोरे वार, कुसुम गावडे, विवेक मुप्पावार, ग्रामपंचायत सदस्य, राकेश गडमवार, विजय गावडे, नितीन गोरडवार, समस्त गावकरी व युवक वर्ग उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत