Top News

पीक कर्जाचे वाटप तात्काळ करा अन्यथा शेतकरी संघटना डफडी बजाओ आंदोलन करणार. #Jivati

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- शेतकरी संघटना जिवती तालुक्याच्या वतीने भारतीय स्टेट बॅंक शाखा पाटणच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. खरीप हंगाम संपत आला तरी सर्विस एरिया परिसरातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जाचे वाटप झाले नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कपाशी, तूर,ज्वारी, मुंग, उडीद आदी पीकाची लागवड केली आहे गत वर्षी परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी संकटात आहे.
पीक कर्ज घेऊन पेरणी करावी अशी आशा असताना अद्यापही शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप झाले नाही.शेतकऱ्यांनी सावकारा कडून कर्ज काढून पेरणी केली आहे.त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची समस्या समजून घेऊन शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप त्वरीत करावे या १० दिवसात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झाले नाही तर शेतकऱ्यांना घेऊन बॅंकेच्या समोर डफडी बजाओ आंदोलन शेतकरी संघटना तालुका जिवतीच्या वतीने करण्यात येईल याची दक्षता घ्यावी निवेदन देताना सय्यद शब्बीर जागीरदार तालुकाप्रमुख शेतकरी संघटना, रामेश्वर नामपल्ले युवा आघाडीचे तालुकाप्रमुख व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने