Top News

एक तास चाललेल्या थराराचा पोलिसांनी घटनास्थळीच बेड्या ठोकून केला अंत. #arrested



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- काल ११ सप्टेंबरला युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे हे राजुरा विधान सभेतील युवकांचा पक्ष प्रवेश घेऊन नेहमीप्रमाणे थेट गावो गावी जाऊन जनतेच्या समस्यांचा आढावा घेत ते याच दिवशी रात्री चंद्रपूर ला परत येत असताना बाबुपेठ येथील आंबेडकर चौक, अशोका स्पोर्टिंग क्लब चंद्रपुर या चौकामध्ये मुख्य मार्गांवर गुन्हेगारी वृत्तीचा विक्रम टाक नामक युवक आपल्या २-३ मित्रांसह रस्त्यावरील ये-जा करणांऱ्या काही व्यक्तींवर त्यांच्या गाड्या थांबून त्यांच्यावर हल्ला करण्याकरिता त्यांच्या गाडीवर तलवारीचे वार करीत हाेता. या शिवाय गाडीची काच फोडीत त्यांना तलवारीचा व चाकूचा धाक देत हाेता त्या नंतर ताे दरोडा टाकून पैसे लुटण्याचे प्रकार करीत हाेता. हा थरारक प्रकार शनिवारला रात्री १०:१५ च्या सुमारास सर्रासपणे सुरू होता. तेथील परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. #Arrested

💥मुलगी भाव देत नाही; खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र.

त्याच वेळी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे व त्यांचे सहकारी राहुल चव्हाण यांनी हा प्रकार पाहताच त्यांनी या दहशतखोरांची तक्रार चंद्रपूर पोलीस दलातील निलेश वाघमारे (पोलीस उपनिरीक्षक, सिटी पोलीस स्टेशन, चंद्रपूर) यांचे कडे केली. त्यांनी आपल्या हद्दीची पर्वा न करता चंद्रपूर शहराला गुन्हेगारीमुक्त करण्याकरिता प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत तात्काळ ते पाेलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले.
आंबेडकर चौक, बाबुपेठ येथील अशोक स्पोर्टिंग क्लब येथे वाघमारे यांनी आपल्या पोलीस सहकाऱ्यांसह सापळा रचून अखेर दहशतखोर विक्रम टाक या अट्टल गुन्हेगाराला व त्याच्या साथीदारांना घटनास्थळीच बेड्या ठोकून रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धोबे यांच्या ताब्यात दिले.
युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे व पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघमारे यांच्या तत्परतेने होणारा अनर्थ टळला.

विशेष उल्लेखनीय बाब अशी की, चंद्रपूर पोलीस दलातील निलेश वाघमारे हे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांच्याशी ते परिचित असल्यामुळे त्यांच्या जागृकतेकडे पाहून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढू नये व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये हा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी आपल्या अधिकार क्षेत्रातील हद्दीची पर्वा न करता गुन्हेगारीचा नायनाट व्हावा ह्या मुळ उद्देशाने प्रामाणिकपणे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून आपले कर्तव्य बजाविले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने