नक्षल्यांनी केला शेतकऱ्याचा खुन. #Murder

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- धानोरा तालुक्यातील मुरूमगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील केहकावाही गावातील एका शेतकऱ्याचे गुरुवार (ता. ९) च्या रात्री नक्षलवाद्यांनी घरातून अपहरण केल्यानंतर शनिवारी (ता. ११) पहाटे त्याचा कुऱ्हाडीने खून केला. तसेच त्याचा मृतदेह गावालगतच्या जंगलात टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. बिरसुराम तुलावी, रा. केहकावाही, असे मृताचे नाव आहे. #Adharnewsnetwork 

💥मुलगी भाव देत नाही; खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र.

मृत बिरसुराम तुलावी केहकावाही येथे शेती करीत होता. नक्षलवाद्यांनी गुरुवारी रात्री त्याचे घरून अपहरण केले व जंगलात घेऊन गेले. त्याला प्रचंड मारहाण केली व खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह गावाजवळ टाकून दिला. घटनेची माहिती जंगलाकडे गेलेल्या माणसांना मिळाली. त्यावरून पोलिसांना माहिती देण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार मृतदेह त्याच्या नातेवाइकांनी ताब्यात घेतला. या परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे गावाजवळचा नाला भरून वाहत होता. त्यामुळे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी किंवा पोलिस कारवाईसाठी आणता आला नाही. बिरसुराम तुलावीचा खून पोलिस खबऱ्या म्हणून केल्याची चर्चा आहे. यासंदर्भात पोलिस विभागाचे जनसंपर्क अधिकारी अशोक माने यांना विचारणा केली असता खून झाला असला, तरी पोलिस खबऱ्या म्हणून नक्षल्यांनी त्याचा खून केला असे अधिकृत सांगता येणार नाही, अशी माहिती दिली. #साभार #Murder